संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील : नितेश राणे

0
WhatsApp Group

कणकवली : भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर टीकेची झोड उठवणा-या संजय राऊतांची ‘मविआची गौतमी पाटील’ असा उल्लेख करत भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे. ते म्हणाले “गौतमी पाटील एक उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांत जाऊन नाचते, लोकांना नाचवते, लोकांमध्ये लोकप्रिय पण असेल. अशा गौतमी पाटीलला मी विनंती करेन की तुझं मेकअपचं थोडं सामान असेल तर संजय राऊतांकडे पाठव व त्याचं थोबाड जरा रंगव”.

खासदार गजानन किर्तीकरांनी केलेल्या भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या आरोपावर संजय राऊतांनी भाजपने आपला मूळ स्वभाव बदललेला नसल्याचं म्हटलं. यावर नितेश राणे म्हणाले, “गजानन कीर्तीकरांबद्दल काळजी करु नका. ते हाडाचे शिवसैनिक आहेत व ते बाळासाहेबांच्या विचारांसोबत कधीही तडजोड करणार नाहीत. ते संजय राऊतांसारखे दलाली करणार्‍यांपैकी नव्हेत”.

दरम्यान ज्या गजानन कीर्तीकरांची तुम्हाला आता आठवण येतेय त्यांच्याच घरात वाद लावण्याचा प्रकार सुरु आहे, उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना त्यांच्याच वडिलांविरूद्ध लढवण्यासाठी तयारी केली आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला.

संजय राऊत हा रंग बदलणारा सरडा

‘भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळूहळू कळायला लागले आहे’, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यालाही नितेश राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे रंग बदलणा-या सरड्याप्रमाणे आहेत, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली.

याबाबत नितेश राणे म्हणाले, “तेजस उद्धव ठाकरेंना प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या नवनवीन प्रजाती शोधण्याचा छंद आहे. त्यामुळे लांबलांबच्या ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा सामना कार्यालयात जाऊन त्या सरड्याला पकडून त्याचा अभ्यास करावा, असं माझं म्हणणं आहे. सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यांदा ते रंग बदलतात”.