सिंधुदुर्ग: नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

WhatsApp Group

सिंधुदुर्ग : एकीकडे शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप झाला असताना दुसरीकडे राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोकणातील राजकारणात सध्या एका भेटीची चर्चा जोरदार सुरू आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतलीय. राज ठाकरे आज सिंधुदुर्गात आहेत. या कोकण दौऱ्यादरम्यान नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे हे आज  1 डिसेंबर रोजी मालवण तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 2 डिसेंबर रोजी आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे कणकवली तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच 3 डिसेंबर रोजी ते मुंबई गोवा हायवेवरील राजापूर कार्यालयाचे उद्घाटन करतील.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा