
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत आमदार रमेश लट्टे यांच्या पत्नी ऋतुजा लट्टे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरेची लाज राखण्यासाठी पवारांनी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे असं ते म्हणाले आहेत.
या निवडणुकीत मुरजी पटेल यांचे पारडे जड आहे. स्थानिक काँग्रेस-NCP नेत्यांनी उद्धव गटाचे काम करण्यास नकार दिला आहे.. आज अंधेरीतील काँग्रेसच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले..दगाफटका पराभवमुळे तिघाडीत बिघाडीची शक्यता अधिक आहे.. असं नितेश राणे म्हणाले आहेत.