वडिलांच्या आशीर्वादाने पद मिळवतात आणि मान सन्मान ठेवत नाहीत; नितेश राणेंचा प्रहार

WhatsApp Group

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जुहू येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत बांधकामप्रकरणी राणे यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस धाडली आहे. मुंबई महापालिकेनंतर (BMC )आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने राणेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठलाही नियम नसताना कारवाई करतात.आताच घरी एक नोटीस दिली आहे. काही लोक क्षणात निर्णय घेतात. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असा घणाघात नितेश राणेंनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्राला पणवती लागून आज अडीच वर्षे झाली आहेत. चपट्या मुख्यमंत्री राज्याला भेटलेला आहे.अडीच वर्षे झाले महाराष्ट्रावर राज्य करतात.चपट्या माणसाचे अडीच वर्षे झाले. कुठलाही विकासकाम या महाराष्ट्रात होत नाही. फक्त लोकांना लुटायचा हे एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचे आणि झोपवायचे, हे आम्हाला माहीत आहे. असं नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.