ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे – नितेश राणे

WhatsApp Group

मुंबई – आज मुंबईमध्ये भाजपतर्फे (BJP)पोल खोल मेळावा वांद्रे येथील रंगशारदा येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेमध्ये बोलताना आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना (Shivsena) वाढवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे, असा सवाल नितेश राणे यांनी केला. मुंबईची अवस्था २५ -३० वर्ष शिवसेनेनं काय केली हे समजावे म्हणून ही पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्याचं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, हाजी भाईंनी एवढे बॅनर लावले म्हणून शिवसेनेने (Shivsena) पोलिसांना त्रास द्यायला सुरुवात केली. हाजींना मी सांगतोय चार पाच बाहेर बॅनर कमी करा, आणि मातोश्रीबाहेर एलईडी लावा जेणेकरून मुख्यमंत्री आमचे भाषण ऐकतील, असंही नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

गेली अडीच वर्ष हे सरकार आहे ते लोकांसाठी चाललेलं नाही. ही फक्त ठाकरे सरकार नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू आहे. किती येतात आणि कोण काय घेऊन येतो यावर हे सरकार अवलंबून आहे, असंही राणे (Nitesh Rane) म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना राणे म्हणाले, आता धर्मवीर नावाचा सिनेमा पहा कारण त्यात तुम्हाला समजेल, शिवसेना घडवण्यात उद्धव ठाकरेंचे काय योगदान होते ते, शेवटी कसे येतात पाहा. या सिनेमामध्ये राज ठाकरे आणि राणे साहेब येतात त्यांच्या मागे ते कसे येतात पाहा. उद्धव ठाकरे या सिनेमाचा शेवट न बघता निघून गेले. राणे साहेब आणि राज ठाकरे स्वतःच्या भावाला स्क्रिनवर बघावे लागू नये म्हणून ते निघून गेले, असा टोलाही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.