”उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत नाही, ते नामर्द आहेत”; नितेश राणे यांची टीका

WhatsApp Group

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे जोरदार टीका केली आहे. अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब यांना मातोश्रीचा कारकून असं म्हटलं आहे तर उद्धव ठाकरे यांना नामर्द असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. म्हाडाने अनिल परब यांच्या कार्यालयावर केलेल्या कथीत कारवाईबद्दल माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी ही टीका केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्धल आता टीका होत आहे.

नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात काहीच करण्याची हिंमत नाही. ते नामर्द आहेत. त्यामुळे त्यांना अनिल परब यांच्यासारखे कारकून लागतात. जे दुसऱ्यांची घरे पाडण्याच काम करतात. त्यासाठी नोटीस देतात. तसेच, नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यातील बांधकाम पाडल्याची पाहणी करण्यासाठी अनिल परब येणार असतीत तर त्यांनी येऊनच दाखवाववे. त्यांचा पाहूणचार आम्ही योग्य पद्धतीने करु, असं नितेश राणे म्हणाले.