मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास रजेवर पाठवावं, नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान

WhatsApp Group

सिंधुदूर्ग – खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. अशातच किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपकडून याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. यावरच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत करत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

‘जर दररोज भाजप सरकारच्या नेत्यांवर ठाकरे सरकारच्या गुंडांकडून पोलीस संरक्षणात हल्ला करण्यात येत आहे. याला शौर्य म्हणत असतील… तर मातोश्रीवर बसलेल्या सो-कॉल्ड ‘मर्दां’नी पोलिसांना फक्त २४ तासांसाठी रजेवर जाण्यास सांगाव. हे सर्व थांबेल याची खात्री करू’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला हे चॅलेंज दिलं आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना काल अटक करण्यात आली आहे. त्यांना भेटण्यासाठी जात असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्यात आला. याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही यांनीही संताप व्यक्त केला आहे.