मुंबई – गेली अनेक वर्षे ठाकरे विरुद्ध राणे असा सामना आपण पाहत आलो आहोत. अेनक वर्षे लोटली मात्र या दोन घरातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यातच आता भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाण साधला आहे. नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर नितेश राणेंनी हे ही टीका केली आहे.
93 साली झालेल्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं होत, आता त्यांचा मुलगा 93 च्या दंगलीत आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर सत्तेचा उपभोग घेतोय, त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची गरज आहे. शिवसैनिकांना हे जमणार आहे का? नाहीतर मीच हे काम करतो. असं नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2021
नितेश राणेंनी ट्वीटसोबत एक विडियोदेखील शेअर केला आहे, ज्यात ते म्हणतात 93 ला झालेल्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं होत मुंबईच्या हिंदुंना वाचवल तो बाळासाहेबांनी एक इतिहास रचला होता. मात्र त्यांचा मुलगा 93 च्या दंगलीत आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर सत्तेचा उपभोग घेतोय.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती, मात्र नंतर शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण केले होते. याच अनुषंगाने नितेश राणेंनी हे विधान केल्याचे दिसून येते.