मुलाच्या प्री वेडींग सोहळ्यात नीता अंबानींचा खास डान्स, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची जगभरात चर्चा होत आहे. गुजरातमधील जामनगर येथे आयोजित अंबानी परिवाराच्या या विशेष कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात बॉलीवूडच्या सर्व स्टार्सनी सहभाग घेतला. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी डान्स केला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

वृत्तसंस्था ANI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर अनंत अबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेंडिंग सेरेमनीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी शास्त्रीय नर्तकांसोबत विश्वंभरी स्तुतीवर परफॉर्म करताना दिसत आहेत. यावेळी नीता अंबानी यांनी केशरी रंगाची साडी नेसली होती. नीता अंबानींचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.