निलेश साबळेंनी नारायण राणेंची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं प्रकरण काय आहे?

WhatsApp Group

मुंबई – Zee मराठीचा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक आणि अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) व त्यांच्या टीमने भारताचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. Zee मराठी टीव्हीवर झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात नारायण राणे ( Narayan Rane ) यांचे एक पात्र दाखवण्यात आले होते, या कार्यक्रमात नारायण राणेंची बदनामी होईल असं हे पात्र साकारण्यात आलं होतं, यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचा आरोप राणे समर्थकांकडून करण्यात आला होता.

Zee चा हा शो टेलिकास्ट झाल्यानंतर अनेक कट्टर राणे समर्थकांनी Zee मराठी आणि निलेश साबळे यांना फोन करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज निलेश साबळे आपल्या टीमसह नारायण राणे यांच्या अधिश निवासस्थानी त्यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. यावेळी भाजप आमदार आणि नारायणराव राणे ( Nitesh Narayan Rane )यांचे पुत्र नितेश राणेही उपस्थित होते. अशी माहिती काही राणे समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.


नारायण राणेंची भेट घेऊन निलेश साबळे काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब हे आमच्या ‘चला हवा येऊ द्या’ शोचे प्रेक्षक असून त्यांनी वेळोवेळी कलाकारांचा सन्मानच केला आहे. आम्हाला कुणाच्याच भावना दुखावायच्या नव्हत्या, आमच्या टीमकडून परत अशी कोणतीच चूक होणार नाही असं ‘चला हवा येऊ द्या’ ( Chala Hawa Yeu Dya ) चे सूत्रसंचालक निलेश साबळे यावेळी म्हणाले. अशी माहिती राणे समर्थकांनी दिली आहे.