राज्यात सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाविषयी शरद पवारांनी हे विधान केलं होतं त्यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.
त्यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांची थेट औरंगजेबाशीच तुलना करणारं एक ट्वीट केलं आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”
आता निलेश राणे यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023