Ratnagiri Refinery Project: रत्नागिरीत ग्रामस्थांनी ताफा आडवताच निलेश राणे म्हणाले ‘हात जोडून माफी मागतो’

Ratnagiri Refinery Project : रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प (Ratnagiri Refinery Project) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) सर्वेक्षणासाठी निलेश राणे (Nilesh Rane) बारसू गावात (Barsu Village) दाखल झाले होते या वेळी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. ग्रामस्थांचा रोश पाहताच निलेश राणे यांनी नरमाईची भूमिका घेत म्टले की, ‘आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मी तुमची हात जोडून माफी मागतो.’ राणे समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना शिविगाळ केल्याचा ग्रामस्थांचे म्हणने होते. ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन निलेश राणे यांनी हे उद्गार काढले.
निलेश राणे म्हणाले, आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल. मात्र, तुम्ही जो शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत. मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा”, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.
नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी ही विनाशकारक आहे, मग आमच्या गावासाठी चांगली कशी आहे, असा सवाल निलेश राणेंना ग्रामस्थांनी केला. दरम्यान गावकरी काहीही ऐकायला तयार नव्हते. जवळपास अर्धातास गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला होता.