
रत्नागिरी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी रत्नागिरी येथे आगमन झाले आहे. दुपारी 1 वाजेच्या दरम्यान रत्नागिरीतील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. विमानतळावर उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
विशेष म्हणजे यावेळी भाजपचे खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार निलेश राणे एकत्र दिसल्यामुळे कोकणातील राजकारणात चर्चांना उधाण आलंय.