कणकवली: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक Vinayak Raut राऊत हा चिल्लर माणूस आहे. तो अत्यंत खोटारडा माणूस असून कोकण रेल्वेच्या तिकिटामध्ये काळाबाजार झाला असल्याचे पुरावे त्याने सादर करावेत आणि मग स्टंटबाजी करावी, असे विधान भाजपचे माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे Nilesh Rane यांनी केले आहे.
ते म्हणाले, कोकण रेल्वेच्या तिकिटावरुन काळाबाजार होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना भेटून वाट्टेल ते प्रश्न विचारणारा विनायक राऊत मुर्ख आहे आणि तो लोकांनाही मुर्ख समजतो. तिकिटामध्ये जर काळाबाजार होत असेल तर अमुक एजन्सी अथवा अमुक एक जण काळाबाजार करत असल्याचे पुरावे त्याने सादर करावेत. जर त्यांनी हे काम केलं तर आम्ही त्यांचा सत्कार करु की गेल्या ९ वर्षात त्यांनी एकतरी काम केलं.
त्यांनी पुढे कोकण रेल्वेकडे गणेशोत्सवाच्या काळात जास्त गाड्या सोडण्याच्या मागणीचे ढोंग करण्यावरुनही विनायक राऊत यांचे वाभाडे काढले. ते म्हणाले, त्यांनी पुढे विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले, याने ९ वर्षात खासदार म्हणून काही केलं नाही. नुसती वाट लावली. कोकण रेल्वेकडे करण्याच्या मागण्या तो करत नाही. त्याने इतक्या वर्षात कधी केल्या नाहीत. त्या त्याने केल्या असत्या तर आम्हाला खरोखरच आनंद झाला असता. ज्या अधिकाऱ्यांकडे ते करण्याचे अधिकारच नाहीत त्यांच्याकडे तो या मागण्या करतो त्याला दुसरं काही जमणारं नाही. आपण त्याला खासदार म्हणून निवडून दिलं हे सिंधुदुर्गाचं दुर्भाग्य आहे.