
मुंबई – गेली अनेक वर्षे ठाकरे विरुद्ध राणे असा सामना आपण पाहत आलो आहोत. अेनक वर्षे लोटली मात्र या दोन घरातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यातच आता माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे Nilesh Rane यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला आहे.
“धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray शोभणारे नाही. धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंनाच शोभायचे. उद्धव ठाकरे यांना आता लॉलिपॉप वगैरे असं काहीतरी चिन्ह देऊन टाका.” अशी टीका माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीनंतर निलेश राणे यांनी ही टीका केली आहे. तसेच ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची ती मुलाखत म्हणजे फुटलेला पेपर सोडवणे. आणि ती मुलाखत पूर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचाही आरोप त्यांनी लावला आहे.