
मुंबई – राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचा एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल सुरू आहे. शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. विनायक राऊत यांनी केलेल्या टिकेला आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उत्तर दिलं आहे. ‘स्वत: दहावी दोनदा नापास’ असं म्हणत निलेश राणे यांनी राऊत यांना उत्तर दिलं आहे. राणे यांच्या उत्तरामुळे कोकणातील दोन नेत्यांमधील हा वाद आता आणखी चिघळणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा आज मला पश्चाताप होत आहे. माझ्या हातून मोठे पाप झाले आहे. असं विनायक राऊत म्हणाले होते.
दरम्यान आता त्यांच्या टीकेला निलेश राणे यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो. असं उत्तर ट्वीट करत निलेश राणे यांनी दिलं आहे.
तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2022
निलेश राणे यांच्या उत्तरामुळे आता कोकणातील दोन नेत्यांमधील हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.