
सिंधुदुर्ग : आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही आहात. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे. कशाला उड्या मारता. मतदारसंघात तुमची काय लायकी आहे हे चांगल माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीमध्ये दौऱ्यावर असताना केले होते. याला निलेश राणे यांनी व्टिटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत उत्तर दिले आहे. केसरकरांवर बोलताना निलेश राणे म्हणाले, आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे. असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
Free Booster Dose: 18+ सर्वांना कोरोना लशीचा बुस्टर डोस मोफत, केंद्र सरकाकडून मोठी घोषणा
निलेश राणे म्हणाले, तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका घेतली. आमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमचे पंचायत समिती सदस्य आमच्याकडे आहेत, ग्रामपंचायती आहेत. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. केसरकर कशाला उड्या मारता. तुमची मतदारसंघात काय लायकी आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका. अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना उत्तर दिले आहे.