
मुंबई – सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचे (Rajyasabha Eleciton) संपूर्ण राजकारण सध्या सहाव्या जागेभोवती फिरू लागलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना वर्षा बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. संभाजीराजे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असल्याची चर्चा आहे. आज (सोमवार 23 मे) 12 वाजता संभाजीराजे छत्रपती वर्षावर जाणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
त्यामुळे संभाजीराजे हातात शिवबंधन बांधणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारे ट्विट केले आहे. रात्रभर विचार करा, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी,
आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली,
तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले,
औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले,
पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली?
लाथ मारा त्या खासदारकीला.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 22, 2022
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला. असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.