Nikki Tamboli Biography : बाईsss! म्हणणारी निक्की नेमकी आहे तरी कोण? शिक्षण किती झालंय तीचं? घ्या सर्व माहिती जाणून
Nikki Tamboli Biography : निक्की तांबोळी ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी बिग बॉस आणि खतरों के खिलाडी सारख्या लोकप्रिय शोमध्ये दिसलीय. निक्की चित्रपट, जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील दिसली आहे, तर चला जाणून घेऊया निक्की तांबोळीबद्दल संपूर्ण माहिती.
निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी औरंगाबाद येथे झाला. 2024 नुसार, निक्कीचे वय 28 वर्षे आहे.
निक्कीच्या वडिलांचे नाव दिगंबर तांबोळी असून ते एक्साइड इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि तिच्या आईचे नाव प्रमिला तांबोळी आहे त्या गृहिणी आहेत.
निक्कीला अभ्यासात फारसा रस नव्हता पण निकीच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने तिचा अभ्यास पूर्ण करावा आणि नंतर तिला ज्या व्यवसायात रस होता त्यात करिअर करावे.
निक्कीने तिचे शालेय शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद येथून पूर्ण केले आहे. निकीने ‘किशनचंद चेलाराम कॉलेज’मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. निक्कीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचे तर तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
निक्कीला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव जतिन आहे. पण 2021 मध्ये कोविडशी लढताना त्यांचा मृत्यू झाला. निक्की तिच्या कुटुंबासह मुंबई, महाराष्ट्रात राहते.
जेव्हा निक्की शिकत होती, तेव्हा तिच्या काही मैत्रिणी मॉडेलिंगसाठी ऑडिशन द्यायला जात होत्या, तेव्हा निक्कीनेही त्यांच्यासोबत ऑडिशन देण्याचा विचार केला. निक्की जेव्हा तिच्या मैत्रिणींसोबत ऑडिशनसाठी आली तेव्हा तिची निवड होईल अशी तिला अपेक्षा नव्हती. पण काही दिवसांनी तिला मॉडेलिंगसाठी फोन आला. अभ्यासासोबतच निकीने बराच काळ मॉडेलिंगही केले आहे.
मॉडेलिंग करत असतानाच निकीला टेलिव्हिजन जाहिरातींच्या ऑफर्स मिळू लागल्या. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. बऱ्याच नकारानंतर तिला तेलुगू कॉमेडी हॉरर चित्रपट ‘चिकती गाडीलो चिथाकोतुडू’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि निकीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
2019 मध्ये, निक्कीने ‘कांचना 3’ चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे निक्कीची लोकप्रियता वाढली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्याच वर्षी 2019 मध्ये, निक्कीने तेलुगू चित्रपट ‘थिप्पारा मीसम’ मध्ये काम केले होते ज्यामध्ये निक्कीने मोनिकाची भूमिका केली होती.
2020 मध्ये, निक्कीने ‘बिग बॉस 14’ या शोमध्ये भाग घेतला होता आणि ती सर्वांची आवडती बनली होती. ‘बिग बॉस’मध्ये तिचचे नेहमी कोणाशी ना कोणाशी भांडण होत असे. या शोमध्ये ती दुसरी रनर अप होती.
2021 मध्ये, निक्कीने ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये भाग घेतला जिथे तिने खूप चांगले प्रदर्शन केले. या शोमध्ये निक्की दहाव्या स्थानावर राहिली.
निक्की तांबोळी 2024 मध्ये ‘बिग बॉस मराठी सीझन 5’ मध्ये पाहायला मिळत आहे. ती अंतिम फेरीत पोहोचली आहे.