रात्रशाळा पुन्हा सुरू होणार! शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

WhatsApp Group

मुंबई – लवकरच रात्रशाळा गजबजलेल्या पाहायला मिळणार आहेत. यापुढे महापालिका आणि खासगी शाळांमधील वर्गांसाठी रात्रशाळांकडून कोणतंही भाडं आकरलं जाणार नाही. त्यासोबत मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील प्रयोगशाळा, शाळांमधील वर्ग, वाचनालय, खेळाचे मैदान रात्रशाळांसाठी खुले करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

रात्रशाळांसाठी वर्ग उपलब्ध न होणे, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आणि यामुळे कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. दुबार शिक्षकाची नियुक्ती करताना दिवसा शाळेतील नियमित शिक्षक म्हणून कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे.