जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक

WhatsApp Group

जगात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रतन टाटा यांचा वाढदिवस, पावरी मुलगी, बचपन का प्यार अशा अनेक व्हिडिओंचा समावेश आहे. नुकताच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.

या व्हिडिओमध्ये एक महिला जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर Burj Khalifa उभी आहे. या महिलेने दुसऱ्यांदा या इमारतीच्या टोकावर उभी राहण्याचं धाडस केलं आहे. बुर्ज खलिफा ही इमारत जमिनीपासून तब्बल ८२२ मीटर उंचीवर आहे.

हा व्हिडिओ संयुक्त अरब अमिरातीच्या इमिरेट्स एअरलाइनने emirates airlines शेअर केला आहे. प्रत्येकजण हा व्हिडिओ खूप शेअर करत आहे आणि आश्चर्य व्यक्त करत आहे की ही महिला इतक्या उंच इमारतीच्या टोकावर कशी काय चढू शकली. त्याचबरोबर ही महिला कोण आहे? ती या इमारतीवर का चढली ? हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emirates (@emirates)


जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या टोकावर चढलेल्या महिलेचे नाव निकोल स्मिथ-लुडविक Nicole Smith-Ludvik असं आहे. ती एक प्रवासी, व्यावसायिक स्कायडायव्हर, योगा ट्रेनर आणि स्टंटवुमन आहे. बुर्ज खलिफाच्या टोकावर पोहोचण्यासाठी निकोलला १ तास १५ मिनिटांचा वेळ लागला होता.