पोलार्डच्या जागी निकोलस पूरन बनला वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार

WhatsApp Group

किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेटने आता टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. स्फोटक निकोलस पूरनला आता वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.

पूरनकडे वनडे आणि टी-20 चे नेतृत्व देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावर ट्विट करून ही माहिती दिली आहे.

T20 आणि ODI मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताना पूरन म्हणाला, “वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मला खरोखरच सन्मान वाटतो. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी एक अद्भुत वारसा निर्माण करणाऱ्या अनेक दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून, ही खरोखरच एक प्रतिष्ठित भूमिका आहे, क्रिकेट ही अशी शक्ती आहे जी आपल्या सर्वांना  एकत्र आणते.