IPL 2024: निकोलस पुरन ठोकला यंदाचा सर्वात लांब षटकार, चेंडू मैदानाच्या बाहेर, व्हिडीओ पाहा

WhatsApp Group

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करत 28 धावांनी विजय मिळवला. या मोसमातील लखनऊ सुपर जायंट्सचा हा तिसरा विजय आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ संघाचा उपकर्णधार निकोलस पुरनने दमदार खेळी केली. या सामन्यादरम्यान त्याने 5 षटकार मारले, त्यापैकी एक षटकार त्याने मैदानाबाहेर लगावला.

निकोलस पुरनने या सामन्यात 21 चेंडूत 40 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान निकोलस पुरनने 1 चौकार आणि 5 षटकार ठोकले. या खेळीदरम्यान पुरणने आरसीबीचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीच्या षटकात सलग तीन षटकारही ठोकले. रीस टोपलीने डावातील 19 वे षटक टाकले, या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर निकोलस पूरनने षटकार ठोकला. दुसऱ्या षटकाराची लांबी 106 मीटर होती, जी या मोसमातील सर्वात लांब षटकार आहे.

आयपीएल 2024 मधील सर्वात लांब षटकार
निकोलस पूरनच्या आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यरनेही या मोसमात 106 मीटरचा षटकार मारला होता. व्यंकटेश अय्यरनेही याच मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ही कामगिरी केली होती. यापूर्वी इशान किशनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 103 मीटर लांब षटकार ठोकला होता. त्याचवेळी, आंद्रे रसेल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 102 मीटर लांब षटकार ठोकला.

या यादीत पुरण दुसऱ्या स्थानावर 
निकोलस पूरनने या सामन्यात आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण केले. निकोलस पूरनने आयपीएलमध्ये 100 षटकार मारण्यासाठी 884 चेंडूंचा सामना केला. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 100 षटकार मारणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त आंद्रे रसेल आहे. आंद्रे रसेलने 657 चेंडूत 100 आयपीएल षटकार ठोकले आहेत.

आयपीएल मध्ये कमीत कमी चेंडूत 100 षटकार मारणारे फलंदाज

  • 657 चेंडू – आंद्रे रसेल
  • 884 चेंडू – निकोलस पूरन
  • 943 चेंडू – ख्रिस गेल
  • 1046 चेंडू – हार्दिक पांड्या
  • 1094 चेंडू – किरॉन पोलार्ड