राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) दहशतवादी कट प्रकरणी आज मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयए कर्नाटकातील 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 ठिकाणी छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने या छाप्यात काही लोकांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, NIA महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकत आहे. एनआयएने या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रात कथित ISIS मॉड्यूलबाबत गुन्हा दाखल केला होता. जुलैमध्ये एनआयएने मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नौसैबा यांना पुण्यातून, शरजील शेख आणि झुल्फिकार अली यांना ठाण्यातून, डॉ. अदनम सरकार यांना पुण्यातून अटक केली होती.
Of the total 44 locations being raided by the NIA since this morning, the agency sleuths have searched 1 place in Karnataka, 2 in Pune, 31 in Thane Rural, 9 in Thane city and 1 in Bhayandar. https://t.co/vKl7119DcV
— ANI (@ANI) December 9, 2023
मुंबईतून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने रात्री उशिरापासून मुंबईतील विविध भागात आणि पोलीस ठाण्यांमध्ये छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. या छाप्यात एनआयएचे पथक रात्रीपासून भिवंडी शहरातील विविध ठिकाणी छापे टाकत आहे. NIA ची टीम भिवंडी शहरातील तीन बत्ती भागात एका व्यक्तीच्या घरावर रात्री 4:00 वाजता छापा टाकण्यासाठी गेली होती, मात्र महिला पोलीस दरवाजा उघडण्यास सांगत असताना घरात उपस्थित असलेल्या त्याच महिलेने दरवाजा उघडला नाही. त्या महिलेने सकाळी यायला सांगितले.