NIAची मोठी कारवाई: नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी

WhatsApp Group

मुंबई – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईमधील २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएने (NIA) सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली असून डीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचेत्त आहे.

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमधून  एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यामध्येऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅंग पुन्हा मुंबईत सक्रिय झाली होती.

त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच माहितीच्याआधारे एनआयएने आजची कारवाई केल्याचं सांगितलं जातं आहे.