साताऱ्यातील पुढील वर्षाचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून – पालकमंत्री शंभूराज देसाई

WhatsApp Group

मुंबई : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो.  पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सातारा येथील दसरा महोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढच्या वर्षीपासून सातारा येथे शाही दसरा महोत्सवाच्या नियोजनाबाबत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत पालकमंत्री म्हणून आपण स्वतः चर्चा करणार आहोत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यास मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा जिल्हा शूरांची आणि वीरांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. राज घराण्याची परंपरा सातारा जिल्ह्यास लाभलेली आहे. ही परंपरा जगासमोर आणण्यासाठी पुढील वर्षापासून सातारा येथे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून साताऱ्याला जागतिक पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा