Sanjay Raut : संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच जाणार, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

WhatsApp Group

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. शिवसेना खासदाराच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीतही 2 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच साजरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर राऊत यांनी जामीनासाठी अनेकवेळा न्यायालयात धाव घेतली मात्र आजतागायत त्यांना जामीन मिळाला नाही. या प्रकरणाबाबत तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, या घोटाळ्याच्या एकूण पैशातून आतापर्यंत संजय राऊत यांना  कोटी रुपये मिळाले आहेत.

शिवसेना नेते त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून पडद्याआड काम करत होते. ईडीची चौकशी राऊत यांच्या पत्नी आणि सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे.