कळंबामध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

WhatsApp Group

यवतमाळ – लग्न (marriage) होऊन केवळ तीन महिनेच झालेल्या एका नवविवाहितेने स्वत:च्या राहत्या घरी (home) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळंब (kalamb) शहरामधील रासा रोड परिसरामध्ये असलेल्या हरणे ले-आऊटमध्ये उघडकीस आली.

कल्याणी तुषार इंगळे (kalyani ingle) (वय २१) असम आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दरम्यान घरातील सदस्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कल्याणी हिने आत्महत्या केल्यामुले संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.