भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेला आजपासून होणार सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WhatsApp Group

मुंबई – आयसीसी T20 विश्वचषकानंतर लगेचच भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये 3 सामन्यांची T20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 17 नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात त्यांना यश आले होते. तर दुसरीकडे भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती आणि त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त झालेले भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हा पहिलाच सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही नवी जोडगोळी काय कमाल करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

रोहित शर्मा करणार भारताच्या T20 संघाचे नेतृत्व!

17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. टी20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यां दिग्गाजांचा समावेश आहे. न्यूझीलंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि दोन्ही संघांबद्दल जाणून घेऊयात.

तीन सामन्यांच्या T20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक पाहा

  • पहिली T20I: 17 नोव्हेंबर 2021, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर (संध्याकाळी 7 वाजता)
  • दुसरी T20I: 19 नोव्हेंबर 2021, JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची (संध्याकाळी 7 वाजता)
  • तिसरी T20I: 21 नोव्हेंबर 2021, ईडन गार्डन्स, कोलकाता (संध्याकाळी 7 वाजता)

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक पाहा

  • पहिली कसोटी: 25 ते 29 नोव्हेंबर, ग्रीन पार्क, कानपूर (सकाळी 9:30 वाजता)
  • दुसरी कसोटी: 3 ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई सकाळी 9:30 वाजता)

T20 मालिकेसाठी भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

T20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ – टिम साउदी (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अ‍ॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी.