IND vs NZ: न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारताचा 1-0 ने केला पराभव, तिसरा सामना पावसामुळे रद्द

WhatsApp Group

India vs New Zealand ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळवण्यात आलेला तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बुधवारी येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 51 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 18 षटकांत 1 बाद 104 धावा केल्या होत्या, त्यानंतर पावसाने खेळ थांबवला आणि पुढील खेळ होऊ शकला नाही.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला 50 षटकेही पूर्ण खेळता आली नाही. संघाने 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावा केल्या. यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची धुरा सांभाळली. सुंदरने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 51 धावा केल्या. सुंदरच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. श्रेयस अय्यरने 59 चेंडूत 49 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. या दोन खेळाडूंशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. शिखर धवन 28 धावा करून बाद झाला. त्याचप्रमाणे संपूर्ण टीम ऑलआऊट झाली.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 18 षटकांत 1 गडी गमावून 104 धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला. न्यूझीलंडकडून फिन ऍलनने 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने 54 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. डेव्हन कॉनवे 38 धावा करून नाबाद राहिला. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. केन विल्यमसनही नाबाद राहिला.

टीम इंडियाकडून उमरान मलिकने एकमेव विकेट घेतली. त्याने 5 षटकात 31 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनेही प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 5 षटकात 21 धावा दिल्या. दीपक चहरने 5 षटकात 30 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकात 16 धावा दिल्या.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update