क्रिकेटविश्वात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, या दिग्गज क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

WhatsApp Group

नवी दिल्ली – न्यूझीलंड New Zealand संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे Mitchell Santner tests COVID-19 positive. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा आयर्लंड दौरा लांबणीवर पडणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने रविवारी जाहीर केले की, अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची कोरोना चाचणी शुक्रवारी सकारात्मक आली आहे.

३० वर्षीय टॉम लॅथमला Tom Latham स्कॉटलंडविरुद्धच्या दोन टी-२० आणि नेदरलँडविरुद्धच्या दोन टी-२० याशिवाय आयर्लंडविरुद्धच्या वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. मिचेल सँटनरची टी-20 मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. टॉम लॅथम हा सध्याच्या टी-20 संघाचा भाग नसला तरी त्याला कर्णधारपदाची संधी दिली जाऊ शकते.

न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रक्षिशक गॅरी स्टीड यांनी विश्रांती घेतल्यामुळे आयर्लंड दौऱ्यासाठी New Zealand tour of Ireland मुख्य प्रशिक्षक असलेले शेन जर्गेनसेन म्हणाले की, मिचेल सँटनरला किरकोळ लक्षणे जाणवत आहेत आणि डब्लिनमध्ये त्याच्या आगमनानंतर मालिकेसाठी त्याची उपलब्धता निश्चित केली जाईल. येत्या रविवारपूर्वी मिचेल सँटनरचे दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तर तो खेळण्यास तयार होईल.