Team India A Squad: न्यूझीलंड-अ विरुद्ध भारत-अ च्या एकदिवसीय संघाची घोषणा, संजू सॅमसनकडे संघाची कमान

WhatsApp Group

India A Squad against New Zealand A: न्यूझीलंड-अ विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारत-अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने यासाठी 16 सदस्यीय संघाची निवड केली आहे. संघाची कमान संजू सॅमसनकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2022 चे स्टार खेळाडू उमरान मलिक आणि तिलक वर्मा यांनाही या संघात स्थान देण्यात आले आहे. अंडर-19 वर्ल्डकपचा ​​स्टार राज अंगद बावाही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

आयपीएल आणि रणजी ट्रॉफीमध्ये दमदार खेळ दाखवणारे रजत पाटीदार, शाहबाज अहमद न्यूझीलंड-अ विरुद्धच्या वनडे मालिकेतही दिसणार आहेत. टीम इंडियाकडून खेळण्याचा चांगला अनुभव असलेल्या शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, रुतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंनाही इंडिया-अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत-अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील तिन्ही सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवले जातील. पहिला सामना 22 सप्टेंबरला, दुसरा सामना 25 सप्टेंबरला आणि तिसरा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबरला होणार आहे.

भारताचा अ संघ 

पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, राहुल चहर, टिळक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राजन कुमार, राजकुमार बावा.

विशेष म्हणजे पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. त्याच्या जागी आउट ऑफ फॉर्म असलेल्या ऋषभ पंतला एंट्री मिळाली. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडिया मॅनेजमेंटला यासाठी सातत्याने टार्गेट केले जात होते. सोशल मीडियावर चाहत्यांनी संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता संजू सॅमसनला भारत-अ संघाचा कर्णधार बनवल्यानंतर ही नाराजी बऱ्याच अंशी दूर होऊ शकते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा