CSA T20 Challenge 2022-23: T20 सामन्यात पहिल्यांदाच 500 धावा बनल्या आहेत. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या शतकाच्या जोरावर टायटन्सने प्रथम खेळताना 3 गडी गमावून 271 धावा केल्या. प्रत्युत्तरात, CSA T20 चॅलेंजच्या सामन्यात, नाईट्सनेही जोरदार झुंज दिली, परंतु संघ 9 विकेट्सवर 231 धावाच करू शकला. अशा प्रकारे सामन्यात एकूण 501 धावा झाल्या. यापूर्वी 2016 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या सुपर स्मॅश सामन्यात सर्वाधिक 497 धावा केल्या होत्या. 19 वर्षीय ब्रेव्हिसने 162 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसाठी T20 मध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला. दिग्गज एबी डिव्हिलियर्सलाही हे करता आले नाही.
आयपीएल टीम मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसने सामन्यात 57 चेंडूंचा सामना करत 162 धावा केल्या. 13 चौकार आणि 13 षटकार मारले. अशा प्रकारे त्याने एकूण 26 चौकार लगावत 130 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 284 होता. टी-20 मधील कोणत्याही खेळाडूची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात नाईट्सकडून गिहान क्लोटेने 51 धावा केल्या, पण संघाला हा सामना जिंकता आला नाही.
RECORD BREAKER 🚨
Highest domestic T20 score ✔️
Fastest domestic century ✔️
3rd highest score of all time ✔️@BrevisDewald | 1⃣6⃣2⃣ runs | 5⃣7⃣ balls1⃣3⃣ fours
1⃣3⃣ sixes#CSAT20Challenge #BePartOfIt #SummerOfCricket pic.twitter.com/BonGpZ5L87— DomesticCSA (@DomesticCSA) October 31, 2022
डीवाल्ड ब्रेविस हा टी-20 मध्ये सर्वात जलद 150 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 52 चेंडूत ही कामगिरी केली आहे. यासह त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलला मागे टाकले. 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना गेलने पुण्याविरुद्ध 53 चेंडूत ही खेळी केली होती. या सामन्यात त्याने नाबाद 175 धावांची खेळी केली. टी-20 मधील कोणत्याही फलंदाजीची ही सर्वोत्तम खेळी आहे.
यासह ब्रेव्हिस दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 मधील सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला. त्याने क्विंटन डी कॉकला मागे सोडले. IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने KKR विरुद्ध नाबाद 140 धावा केल्या. पीटर मलानने 2014 मध्येही नाबाद 140 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी डिव्हिलियर्सची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 133 आहे. आरसीबीकडून खेळताना त्याने 2015 मध्ये मुंबईविरुद्ध ही कामगिरी केली होती.