PM Awas Yojana 2022 : पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर, तुमचे नाव आहे का? असे तपासा…

WhatsApp Group

PM Awas Yojana 2022 List: सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवनवीन निर्णय घेत असते. अनेकवेळा सरकारकडून नवीन योजना (Central Government Scheem) आणून सामन्य नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. अशाच प्रकारे देशातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना (PM Awas Yojana 2022) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत लाखो लोकांना लाभ दिला आहे.

तसेच या योजनेअंतर्गत (Government Scheme) लाभासाठी अनेक लोकांनी अर्ज केलेले आहेत. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अनेक अर्जदार आपल्याला लाभ कधीपर्यंत मिळणार या प्रतीक्षेत आहेत. अशा अर्जदारांनी आपल्या आर्जाची स्थिती (PM Awas Yojana List) तपासली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती घरी बसून कशी तपासावी हे सांगणार आहोत.

पंतप्रधान आवास योजना शहरी यादी कशी तपासावी?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (https://pmaymis.gov.in/) वेबसाइटवर जावे लागेल.
  • होम पेज उघडल्यानंतर मुख्यपृष्ठावर ‘सर्च बेनिफिशिअरी’ पर्यायामध्ये ‘बाय नेम’वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, तिथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • आता शो बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल.
  • जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुम्हाला या यादीत तुमचे नाव दिसेल.

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण यादी कशी तपासावी?

  • यासाठी तुम्हाला येथे दिलेल्या लिंकवर (https://awaassoft.nic.in/netiay/AdvanceSearch.aspx) क्लिक करावे लागेल.
  • यानंतर येथे विचारलेली राज्य, जिल्हा, ब्लॉक इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर पीएम आवास योजना ग्रामीणची यादी येईल.
  • जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल तर तुम्हाला तुमचे नाव यादीत दिसेल.