Photo: Rang Majha Vegla मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री, साईशाची जागा घेणार ‘ही’ बालकलाकार

WhatsApp Group

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) रंग माझा वेगळा (Rang Majha Vegla) मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) हिने मालिका सोडली. साईशाने मालिका सोडल्यामुळे मालिकेत आता कार्तिकीची (Kartiki) भूमिका कोण साकारणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.

अखेर मालिकेत नव्या कार्तिकीनं एंट्री घेतली असून नवी कार्तिकी ही बालकलाकार मैत्रेयी दाते (Maitreyi Date) ही साकारणार आहे. मैत्रेयी आणि दीपिका यांचं एकत्र फोटोशूट देखील पार पडले असून नव्या कार्तिकीचे फोटो समोर आले आहेत.

बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्रेयीही अभिनयाबरोबरच नृत्यही करते. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्येही काम केले आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे.