दक्षिण आफ्रिकेत सापडला कोरोनाचा अत्यंत भयानक व्हेरिएंट!

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका वाढताना दिसतं आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला हा व्हेरिएंट आता इस्रायल, हाँगकाँग, बोत्सावाना या देशांमध्ये पसरला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट अत्यंत भयानक आहे, असे शास्त्रज्ञ म्हणतं आहेत.

जाणून घ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल
Omicron (B.1.1.529) असे या व्हेरिएंटला नाव देण्यात आले आहे. या व्हेरिएंटमध्ये एकूण 50 उत्परिवर्तन असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी 30 त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. यामुळे हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.


ओमिक्रॉन या व्हेरिएंटची लागण प्रथम दक्षिण आफ्रिकेतून सुरू झाली आहे. आतापर्यंत 77 लोकांना या प्रकाराची लागण झाली असून, बोत्सवानामध्य 4 जणांना या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चिंतेची बाब म्हणजे बोत्सवानामध्ये पूर्णपणे लसीकरण झालेले लोकही या व्हेरिएंटला बळी पडले आहेत. हाँगकाँगमध्येही या नवीन व्हेरिएंटची 2 प्रकरणे आढळून आली आहेत. सध्या दोन्ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. इस्रायलमध्येही या व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रुग्णाची नोंद झाली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटचे 50 उत्परिवर्तन आहेत. तसेच या प्रकारात रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 10 उत्परिवर्तन देखील आहेत. रिसेप्टर बाइंडिंग डोमेन हा विषाणूचा भाग आहे जो प्रथम आपल्या शरीराच्या पेशींच्या संपर्कात येतो. डेल्टा व्हेरियंटमध्ये रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 2 उत्परिवर्तन होते. ओमिक्रॉन हा प्रकार देखील अधिक संसर्गजन्य आहे. दक्षिण आफ्रिकेत, गेल्या 1 आठवड्यात नवीन व्हेरिएंट प्रकरणांमध्ये 200% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

या प्रकारावरील वाढती चिंता लक्षात घेता भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की या प्रकारातील उत्परिवर्तन खूप जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या देशांमधून प्रवास करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.