बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली, काय आहेत नवीन नियम?

WhatsApp Group

मुंबई – सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार आता पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यती होत आहेत. मात्र, आता नियमावलीनुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन करावे लागणार आहे. आता नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई आणि अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.

तसेच नव्या नियमानुसार बैलांचा छळ करणे आणि त्यांना उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन नियमांमध्ये एक हजार मीटर अंतराची अटही ठेवण्यात आली आहे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे अशा स्वरुपाची नियमावली बैलगाडा र्शयतीसाठी शासनाकडून लागू करण्यात आली आहे.