T20 World Cup 2022:भारताने उपांत्य फेरीत मारली धडक, नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी केला पराभव
ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडनंतर भारतानेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ग्रुप-2 मधून उपांत्य फेरी गाठणारा संघ भारत ठरला. अॅडलेड ओव्हल मैदानावर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला आणि या सामन्याचा निकाल लागताच भारताचे उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित झाले. त्याचवेळी या मैदानावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. येथे जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत जाईल.
प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 20 षटकांत 4 गडी गमावून 158 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. 21 धावांवर आफ्रिकेने डी कॉकची विकेट गमावली. यानंतर कर्णधार बावुमाही 39 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वेगवान धावाही करता आल्या नाहीत. 9.3 षटकांत दक्षिण आफ्रिकेने 64 धावांवर तिसरी विकेट गमावली.
WHAT A WIN! 🤩
Netherlands defeat South Africa in their final Group 2 match of #T20WorldCup#SAvNED |📝: https://t.co/4UJVijHlTA pic.twitter.com/zhmHSOpqVe
— ICC (@ICC) November 6, 2022
मार्करामने एका टोकाकडून आघाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण तोही 17 धावांवर बाद झाला. यानंतर मिलरही 17 धावांवर बाद झाला. 17.3 षटकांत 120 धावांपर्यंत मजल मारताना दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावल्या आणि सामना पूर्णपणे नेदरलँड्सच्या ताब्यात गेला. 20 षटकांअखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावाच करू शकला. अशा प्रकारे नेदरलँड्सने हा सामना 13 धावांनी जिंकला.