Neeraj Chopraने रचला इतिहास, डायमंड लीग फायनल जिंकणारा ठरला पहिला भारतीय

WhatsApp Group

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची चमकदार कामगिरी सुरूच आहे. नीरज चोप्राने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने 88.44 मीटर भालाफेक करून ट्रॉफीवर कब्जा केला.

या डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही कारण त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. मात्र, त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला आणि आणि पदकावर आपलं नाव कोरलं.

कंबरेच्या दुखापतीमुळे नीरजने बर्मिंगहॅम येथे आयोजित 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने आता पुनरागमन केले आहे.