व्यायामशाळेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार : मंत्री छगन भुजबळ

0
WhatsApp Group

नाशिक : उत्तम आरोग्य हिच आपली धनसपंदा असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायाम हा अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरात जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत वल्लभनगर भागातील स.नं.65/अ/2 येथे रूपये 60 लक्ष निधीतून उभारलेल्या  व्यायामशाळेचे लोकार्पण मंत्री भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, वसंत पवार, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, पोलीस निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले, आज लोकार्पण झालेल्या व्यायमाशाळेत स्त्रिया व पुरूष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्हींसाठी आवश्यक व्यायामाचे साहित्य लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. आहार पद्धतीतील बदलामुळे आज आपणास नानाविध आरोग्याच्या समस्या व नानाविध रोगांना सामोरे जावे लागत आहे. आपले शरीर निरोगी राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या दिनचर्येतून व्यायमासाठी वेळ देणे काळाची गरज आहे. सर्व स्त्री व पुरूष यांनी या व्यायमाशाळेतील सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.

या विकासकामांचे झाले भुमिपूजन

1) न्हावी गल्ली भागातील रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.13.87 लक्ष)
2) काळा मारूती ते सुरेश मेडीकल पावेतो रस्ता गटारीसह काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.28.12 लक्ष)
3) सटवाई गल्ली भागातील रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.16.74 लक्ष)
4) मधलीगल्ली भागातील रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.29.96 लक्ष)
5) निवारा कॉलनी रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.42 लक्ष)
6) स्वातंत्र सैनिक कॉलनी रस्ता गटारीसह कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रू.16.74 लक्ष)