मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे अडचणीत येताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालमत्त्येच्या व्यवहारांबाबत भाजपने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी होत आहे.
सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांची चौकशी करत आहेत. नवाब मलिक यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी होत असल्याची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नवाब मलिक यांचे समर्थक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सर्व कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत आणि त्यानतंर ईडी कार्यालयावर आंदोलनासाठी धडकणार आहेत.