अभिनेत्री केतकी चितळेवर पोलीस ठाण्याबाहेर अंडी, शाईफेक

WhatsApp Group

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली आणि अंड्यांचादेखील मारा केला आहे.

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेविरोधात ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आज दुपारी नवी मुंबई पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतळे. त्यानंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर तिला ठाणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला. कळंबोली पोलीस ठाण्यातून तिला नेलं जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि काळी शाई फेकली.