”बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं उत्तर

मुंबई – राज्यसभा निवडणुकीतील निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा विरोधकांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ताशेरे ओढताना अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात असा टोला लगावला होता. निलेश राणेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते निलेश राणे?
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार. असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं.
अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
निलेश राणे यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कलच नाही. भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.