मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार, ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!

WhatsApp Group

मुंबई : राज्यात एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारआल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ सिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक ट्वीट करत फोटो शेअर केला आहे, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. मुख्यमंत्री पदाची गरीमा धुळीस मिळवण्याचे काम हे शिंदे पिता पुत्र करत असल्याचे दिसत आहे. हा कोणता राजधर्म आहे ? बाप नंबरी ,बेटा दस नंबरी ..! याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे ..! असं ट्वीट त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा