
सावंतवाडी: व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचा व्हाटसप ग्रुप असून या ग्रुप मध्ये पुंडलिक दळवीसह मारहाण करणारे युवक चा समावेश आहे. मात्र मारहाण करणारा युवक हा ग्रुपमध्ये वारंवार चुकीचे मेसेज पाठवत असल्यामुळे दळवी यांनी त्याला ग्रुप मधून काढून टाकले होते.
ग्रुप मधून काढून टाकल्यानंतर त्या युवकांने मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन दळवी यांचे उभाबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यालयात जाऊन दळवी आपल्याला ग्रुप मधून का काढले ? असा सवाल करण्यात आल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यातूनच त्याने दळवी यांच्या शर्टाला हात घालत हाताच्या थापटांनी मारहाण केली.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा