![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते आपला राजीनामा देणार आहे. विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदार संघात घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मतदार संघात बॅलेटपेपरवर फेर निवडणूक घ्यावी या मागणीसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. मात्र ते विजयी जरी झाले असले तरी निसटत्या मताधिक्याने ते विधानसभेत पोहोचले. आपण एक लाखा पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार होतो हा विश्वास त्यांना.
मतदानात घोळ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे. यासाठी निवडणूक आयोगाकडे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहोत असं त्यांनी स्पष्टचं सांगितलं आहे.