राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण!

WhatsApp Group

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे sharad pawar tests positive for covid19
.


आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. तसेच आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  उपचार घेत असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशानंतर ठाकरे सरकारमधील अनेक मोठे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात पंकजा मुंडे, रोहित पवार, वर्षा गायकवाड , राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांचा समावेश होता.