मोठी बातमी! अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांना अटक!

WhatsApp Group

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ठाकरे सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक NCP leader Nawab Malik यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या आपल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांना जे.जे. रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्वीट करून आपण झुकणार नाही, असे संकेत दिले होते. त्यामुळेच नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. नवाब मलिक यांना मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर नवाब मलिक म्हणाले की, “मला अटक करण्यात आली आहे, पण घाबरणार नाही, आम्ही लढू आणि जिंकू”.