महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या कार्यलयाने ट्विट केले आहे की, ‘मुंडे हे सर्व कार्यक्रम आणि मतदारसंघाचा दौरा करून काल दुपारी 12.30 वाजता परळीत परतत असताना परळी शहरात त्यांचा किरकोळ अपघात झाला, त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
रात्री उशिरा धनंजय मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे कित्येक तास कुणालाही याचा सुगावा लागला नाही. मात्र, आज सकाळी धनंजय मुंडे जखमी झाल्याचे वृत्त शहरात पसरले.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023