नको करू एवढे पाप, शेवटी पवार साहेबचं तुझा बाप; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका

WhatsApp Group

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. दरम्यान केतकीने केलेल्या पोस्टबाबत राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केतकीला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.

अ‍ॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवरुन शेअर केली आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट असल्याचं बोलले जात आहे. त्यानंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात (Kalwa police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आता राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही केतकीला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. सूरज चव्हाण यांनी ट्विट करत दोन ओळींमध्येच केतकीवर बोचरी टीका केली आहे. चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आह की, नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.